in

गणपतीत सुरू असलेल्या जुगारावर छापा; 83 लाखांचा मुद्देमाल जप्त

मयुरेश जाधव | अंबरनाथमध्ये गणपतीत सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला असल्याची घटना समोर आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. या घटनेत तब्बल 83 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली असून शहरातील नामांकित ११ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनयमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ पूर्वेच्या कैलास नगर फार्मिंग सोसायटीतील फार्म हाऊसमध्ये जुगार सुरू होता. या घटनेबाबत स्थानिक शिवाजीनगर पोलीस मात्र अनभिज्ञ होते. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने रात्रीच्या सुमारास छापा टाकत ही कारवाई केली. या छाप्यात 7 लाख 61 हजार रुपये रोख, 2 फॉर्च्युनरसह एकूण 5 गाड्या, महागडे मोबाईल असा तब्बल 83 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच शहरातील नामांकित ११ जणांना पोलिसांनी अटक केली असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनयमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Anil Deshmukh यांना शोधा; ED ची CBI कडे मागणी

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा चौकार; आठवड्यातून चार दिवस निखळ मनोरंजन