in

छत्तीसगडमध्ये रेल्वेत स्फोट; आरपीएफचे 6 जवान गंभीर जखमी

छत्तीसगडची राजधानी रायपूर रेल्वे स्टेशनवर उभी असलेल्या एका रेल्वेत अचानक स्फोट झाल्यानं खळबळ उडाली. या स्फोटात सीआरपीएफचे सहा जवान गंभीर जखमी झाले असून एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. सीआरपीएफच्या २११ व्या बटालियनचे जवान विशेष रेल्वेनं जम्मूला जात होते. यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी असताना अचानक स्फोट झाला. डेटोनेटर बॉक्स फुटल्यानं अपघात झाल्याची माहिती सीआरपीएफनं दिलीय. जखमी झालेल्या जवानांपैंकी हवालदार विकास चौहान यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुर आहेत.

छत्तीसगडची राजधानी रायपूर रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या एका रेल्वेत अचानक स्फोट झाल्यानं खळबळ उडाली. या स्फोटात सीआरपीएफचे सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. शिफ्टिंग दरम्यान काडतुसाच्या पेटीमध्ये स्फोट झाला, ही घटना शनिवारी सकाळी ६.३० वाजल्या दरम्यान घडली. स्फोटानंतर स्टेशनवर एकच खळबळ उडाली. जखमींना उपचारासाटी पाठवण्यात आल्यानंतर रेल्वे सकाळी ७.१५ मिनिटांनी पुढे रवाना करण्यात आली. या स्फोटात कोणत्याही सामान्य नागरिकाला नुकसान झालेलं नाही. सीआरपीएफच्या २११ व्या बटालियनचे जवान विशेष रेल्वेनं जम्मूला जात होते. सीआरपीएफनं दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उभी होती. त्याच दरम्यान हा स्फोट झाला. डेटोनेटर बॉक्स फुटल्यानं हा अपघात झाला. जखमी झालेल्या जवानांपैंकी हवालदार विकास चौहान यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमी चवन विकास लक्ष्मण, रमेश लाल, रविंद्र कर, सुशील, दिनेश कुमार पॅकरा यांचा समावेश आहे. सीआरपीएफचे उच्च अधिकारी जवानांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईमध्ये नायर रुग्णालयात लहान मुलांवर लसीकरणाची ट्रायल यशस्वी

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ! सिन्नरमधील बनावट कागदपत्रांद्वारे जमीन खरेदी