in

लोकल चालवण्यासाठी रेल्वे सज्ज, पण…

कोरोना रुग्णांच्या संख्येत आता मोठी घट झाल्याने आता निर्बंधात सूट देऊन लोकलप्रवास सुरू करण्याची मागणी जोर धरत आहेत. राज्य सरकारने सूचना केल्यानंतर तातडीने सर्वसामान्यांना लोकलमुभा देण्यात येईल. पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी सज्ज असून, केवळ राज्य सरकारच्या होकाराची प्रतीक्षा करत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

रिक्षा-टॅक्सींमध्ये मर्यादित प्रवासी निर्बंधाचे पालन क्वचितच होते. रेल्वे प्रवासासाठी हजारो बनावट ओळखपत्रांचा खुलेआम वापर होत असल्याचे रेल्वे अधिकारी देखील कबुली देतात. अत्यावश्यक प्रवाशांपैकी खरे कोण? आणि खोटे कोण? ओळखताना रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुबोधकुमार जयस्वाल यांची CBI संचालकपदावर नियुक्ती

शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानाची सुरक्षा वाढवली