in

मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाची बॅटिंग; रस्ते जलमय

मान्सून महाराष्ट्रात आला आणि पहिल्याच दिवशी मुंबईला चांगलेच झोडपून काढले. 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला।आहे. कोकणातसुद्धा चार ते पाच दिवस अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona : 11 हजार 766 नवे कोरोनाबाधित; रिकव्हरी रेट 95.4 टक्के

एका नव्या व्हायरसचा धोका, साताऱ्यात तरुणाचा बळी