in

कोल्हापुरात पावसाचं थैमान; NDRFची टीम रवाना

कोल्हापुरात पावसानं धुमशान घातलं आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 36 फुटांपर्यंत पोहोचली आहे. तर जिल्ह्यातले तब्बल 77 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुण्याहून कोल्हापूर कडे NDRF दोन तुकड्या रवाना झाल्या आहेत.

जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. अशातच कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आलं असून कोल्हापूर गगनबावडा मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच मांडुकली येथं कुंभी नदीचं दोन फूट पाणी रस्त्यावर आलं आहे. त्यातच धोक्याची पाणी पातळी गाठण्यासाठी पंचगंगा नदीत 4 फूट पाणी कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात असाच पाऊस राहिल्यास पंचगंगा नदी लवकरच धोक्याची पातळी ओलांडेल. 39 फूट ही पंचगंगा नदीची इशारा पातळी असून सध्या नदीची पातळी 36 फूट आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गगनबावडा तालुक्यांमध्ये रात्रभर अतिवृष्टी झाली आहे. बर्की गावात जाणाऱ्या पुलावर पाणी आल्यानं बर्की गावचा संपर्क तुटला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चिपळूणमध्ये ढगफुटी; मुंबई – गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प

बदलापुरात मुसळधार पाऊस; रेल्वे रूळ पाण्याखाली