in

Chembur Wall Collapse: चेंबूरमध्ये भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू; विक्रोळीत 7, तर भांडूपमध्येही एक दगावला

पावसाने शनिवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली आहे. यात 17 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर 6 ते 8 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत पाच घरे पडली आहेत. दोन घरांतून मलबा काढण्यात आला आहे. तर तीन घरांतील मलबा काढणे अद्याप बाकी आहे.

तसेच, विक्रोळी भागात एक इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झल्याचे आणि भांडूप भागातही एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय, फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याची माहिती आहे.

मुंबईमध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे विक्रोळी भागात एक इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झल्याचे वृत्त आहे. तर 5 ते 6 लोक यात अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, मुसळधार पावसाचा भांडुप पंपिंग स्टेशनच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत काही भागांला पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेने कळवले आहे.

मध्यरात्री झालेल्या पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून, अनेक भागांतील वाहतूक विस्कळित झाली आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे. बाहेरून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल-सीएसएमटी हार्बर मार्गावरील वाहतूकही ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साप्ताहिक राशीभविष्य | पाहा कसा असेल तुमचा आठवडा ?

चेंबूर, विक्रोळी दुर्घटना : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला शोक!