in

भिवंडीत पावसाने उडवली दाणादाण; अनेक भागात पाणी साचले

गेल्या काही दिवसांपासून वरूणराजाने आपला वेग मंदावला होता. मात्र दिवसभर रिपरिपणाऱ्या पावसाने भिवंडीत व ग्रामीण  त्रेधातिरपीट उडवून दिली आहे. तुंबलेली गटारे,  दमछाक आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे व्यापारी-दुकानदार-पादचारी-वाहन चालकांची फजिती झाल्याचे पहायला मिळाले 

नालेसफाईच्या दाव्याबाबत नागरिकांनी केले प्रश्नचिन्ह उपस्थित एकीकडे हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पावसाने दमदार हजेरी लावत भिवंडी त  सुखद दिलासा दिला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यावेळीही पाणी साचलेले पहायला मिळाले. काही ठिकाणी घरांत, तर काही सार्वजनिक ठिकाणी असलेल्या दुकानांमध्ये गटाराचे पाणी शिरल्याने रहिवाशांसह दुकानदारांची पळापळ झाली. त्यामुळे भिवंडी  महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईच्या दाव्याबाबतही नागरिकांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सीबीडीच्या डोंगरावर फिरायला गेलेल्या 350 जणांना अतिउत्साहीपणा नडला

रायगड जिल्ह्यात पावसाचा कहर