in

रायगड जिल्ह्यात पावसाचा कहर

मागील दोन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. राज्यात पावसाचा जोर अजून ५ दिवस असाच राहणर आहे. अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. अशा परस्थितीत रायगड जिल्ह्यात पावसाचा कहर केला आहे. पेणच्या तांबडशेत इथे रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला आहे. तर दुसरीकडे बाळगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गालगत जिते गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त समोर येत आहे. तर सणांच्या दिवसात जोहे गावातील गणपती कारखान्यात पुराचे पाणी गेल्याने खुप नुकसान झाल्याचे माहिती समोर येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भिवंडीत पावसाने उडवली दाणादाण; अनेक भागात पाणी साचले

Pegasus Spying | 40 हून अधिक पत्रकारांवर हेरगिरीचा दावा