in

राज कुंद्राला अटक, पॉर्न फिल्म प्रकरण भोवलं?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

मात्र, राज कुंद्रा यांच्या अटकेची माहिती समोर येत आहे.  एका प्रकरणात राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं होतं. आज दिवसभर त्यांची चौकशी झाली. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेनं अटक केली.

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. याप्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अखेर मागणी मान्य; पंढरपुरात अखेर 300 वारकऱ्यांना परवानगी

आठ तासांच्या ड्रायव्हिंगनंतर मुख्यमंत्र्यांची कोरोना आढावा बैठक