in

राज कुंद्राचे धागेदोरे उत्तर प्रदेशपर्यंत

अश्‍लील चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचसमोर दररोज नवनवीन खुलासे येत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणाचे धागेदोरे आता उत्तर प्रदेशच्या कानपूरशी असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्रा आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या व्यतिरिक्त कानपूरच्या एका महिलेचे देखील बॅंक खाते सील करण्यात आले आहे.

या महिलेच्या बॅंक खात्यात अश्‍लील चित्रपट निर्मितीच्या उत्पन्नाचे कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. संबंधित बॅंक खाते हे हर्षिता श्रीवास्तव नावाच्या महिलेचे आहे. हे बॅंक खातं जेव्हा सील करण्यात आले तेव्हा त्या खात्यात 2 कोटी 32 लाख 45 हजार 222 रुपये होते. मुंबई क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, हॉटशॉट्‌सच्या व्हाट्‌सऍप ग्रुपमध्ये अरविंद कुमार नावाचा एक व्यक्ती आहे. या अरविंदच्या पत्नीचे नाव हर्षिता असे आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अन्नू मलिक यांना मातृशोक…

पुरग्रस्त भागातील व्हॅक्सीन आणि टेस्टिंग दोन ते तीन दिवसात होणार सुरुळीत