in ,

महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना, राज ठाकरे यांची परमबीर सिंह प्रकरणी टीका

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपा आक्रमक होत, त्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन

Ind Vs Eng : भारताने उभारला धावांचा डोंगर.. इंग्लंडसमोर २२५ धावांचे आव्हान