in

Raj Thackeray | ‘दहावी – बारावीच्या विद्यार्थांना प्रमोट करा’

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाऊन आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा यासह विविध विषयांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं. ‘काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. या लॉकडाऊनबाबत भेटीची विनंती केली होती, त्यांचा फोन आला की त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक कोव्हिड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलंत आहे, त्यामुळे झूमवर बोलण्याचं ठरलं. आम्ही दोघंच असल्यामुळे आमच्यात काय बोलणं झालं, हे सांगण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेतली आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. या परिषद दरम्यान ‘दहावी – बारावीच्या विद्यार्थांना प्रमोट करा’, याकाळात शाळेनी अर्धी फी घेतली पाहिजी अशी माहिती यावेळी दिली.

महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्याही जास्त आहे. शेतकरी मोर्चा, पश्चिम बंगाल निवडणूक सुरू आहेत. तिथे कोरोनाची लाट पसरलीय हे दिसत नाही, पण महाराष्ट्रात कोरोना लाट सर्वाधिक पसरतेय हे दिसतंय. बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणारी माणसं आणि दुसऱ्या राज्यात कोरोना रुग्ण मोजले जात नसल्याने त्यांची आकडेवारी समोर येत नाही. त्याठिकाणी कोरोना असेल तर पण संख्या समोर येत नाही असं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे LIVE

  • माझं मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं, ते सांगण्यासाठी पत्रकार परिषद
  • राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची चाचणी करा
  • लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था कोसळली आहे
  • शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे
  • दहावी – बारावीच्या विद्यार्थांना प्रमोट करा
  • आमच्या पद्धतीने जाणीव करून देण्याची वेळ नाही

राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना

उत्पादनाबाबत – जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितलंय पण विक्रीला बंदी आहे, असं असेल तर उत्पादन करुन ठेवायचं कुठे, विकायचं नाही तर उत्पादन का करायचं… म्हणून मी सांगितलं दोन तीन दिवस विक्रीसाठी सुरु ठेवा. छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून २-३ दिवस दुकानं सुरु करण्यास परवानगी द्या

बँकांची जबरदस्ती – अनेकांनी छोटी मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केलं जात आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे?

वीज बिल – सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे

व्यवसाय कर – जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना  सूट द्या, राज्याने केंद्राशी बोलावं

कंत्राटी कामगार – लॉकडाऊनमध्ये सरकारी कंत्राटी कामगारांना घेतलं होतं, पण नंतर काढून टाकलं.. मी सूचना केली, त्यांना घ्या, तहान लागली की विहीर खोदणं योग्य नाही़

या सूचना योग्य आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळाशी बोलण्याचं आश्वासन दिलं.

जीम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी

स्वीमिंग पूल बंद ठिक आहे.. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जीम सुरु ठेवावी.

सरकारची तिजोरी माहिती आहे- शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. शेतकरी जर कोसळला तर पुन्हा अजून मोठं संकट येईल

शेवटची सूचना शाळा-  शाळा बंद आहेत, पण शाळांच्या फी तशाच आहेत. या शाळांना फी घेऊ नका, अर्धी घ्या किंवा काहीही…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा.. ते कोणत्या मानसिकतेत माहिती नाहीत.. ही पोरं तर लहान, कुठून अभ्यास करणार , कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत

खालच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं, तसं दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे ढकला.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘जय भवानी जय शिवाजी’; मराठी छोट्या पडद्यावर पुन्हा इतिहास जिवंत होणार

दिवंगत ऋषी कपूर यांच्या जागी बिग बी, पिकू नंतर ‘या’ सिनेमात दीपिकासोबत कास्ट