मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षनेते आक्रमक होत, त्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. आज अध्यक्ष राज ठाकरे कृष्णकुंज येथे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
- गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा
- सर्व प्रकरणाचा मूळ विसरू नका
- परमबीर सिंह यांना पदावरून का काढलं ? याच उत्तर अजून सरकारने दिले नाही
- परमबीर सिंह यांची चौकशी का केली नाही ?
- जिलेटिन नेमक आलं कुठून ? याचा शोध घेतला पाहिजे
- हा विषय वाझे आणि परमबीर सिंह यापर्यंत मर्यादित नाही.
- वाझे शिवसेनेचा जवळचा माणूस
- पोलीस बॉम्ब ठेवतात हे ऐकलं नव्हतं पाहिलं नव्हतं
- अतिरेकी ठेवतता हे ऐकलं होतं पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे ऐकलं नव्हतं पाहिलं नव्हतं
- कुणाच्या तरी सांगण्यावरून पोलीसांच धाडस
- केंद्राने या प्रकरणी हस्तक्षेप करावा
- कोणाच्या सांगण्यावरून गाडी ठेवली गेली याचा तपास करावा
- योग्य तपास न झाल्यास लोकांच पोलीसंवरून विश्वास उडेल
- अंबानी कडून पैसे काढण्यासाठी कट रचला गेला ही थेअरी चुकीची
- मुख्यमंत्री आणि अंबानी यांचे जिव्हाळ्याचे संबध
- पोलीस असं धाडस करू शकत नाही .
- ही घटना साधी नाही
- योग्य चौकशी झाली तर फटाक्यांची माळ लावेन.
- आपल्या देशात प्रश्न निर्माण होतात, उत्तर मिळत नाही.
- राज्यकर्त्यांमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होते आहे.
- दुनियेमध्ये कुठेही जर मुंबई पोलिसांपेक्षा चांगले पोलीस कुठेही सापडणार नाहीत.
- गृहमंत्र्यांनी राज्यातील बाकीच्या पोलिस कमिशनर्सना काय सांगितलंय हे तपासावं.
- लाज वाटली महाराष्ट्रात गृहमंत्री सारख्या माणसाने असं करावं
- नाहीतर हा देश अराजकता कडे चाललाय हे लक्षात ठेवा
Comments
Loading…