in ,

रेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावे; राज ठाकरेंचे मोदींना पत्र

देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. रेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावे अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

A letter of appeal to the PM Narendra Modi, regarding giving the purchasing and distribution authority of remdesevir and other essentials to the states. Narendra Modi

Posted by Raj Thackeray on Thursday, 22 April 2021

पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करताना राज्यांना देखील काही सूचना केल्या होत्या. आणि या भयानक संकटाचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन देखील केले जाते. मग अस असताना रेमडेसिवीर ची खरेदी आणि वितरण केंद्राने स्वतःकडे ठेवण्याचे प्रयोजन काय ? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रातून केला आहे.

याबाबतीत माझी आपल्याला नम्र विनंती आहे की रेमडेसिविर कसं घ्यायचं, कुठे, कसं वितरित करायचं ह्याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी. ते काम खरंतर केंद्राचं नाही. असे राज ठाकरे यांनी म्हंटल.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एसटीबाबत काय नियम असणार?; अनिल परब म्हणाले…

‘देशावर संकट येताच न्यूयॉर्कला पळून चालले’, म्हणतं शाहरुख खानच्या कुटुंबाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल