in

IPL 2021 | राजस्थान रॉयल्सचा दिल्ली कॅपिटल्सशी सामना

आयपीएलच्या आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. दरम्यान या सामन्यानिमित्त दोन तरुण कर्णधार आमने सामने येणार आहे.

दिल्लीने यापूर्वी जबरदस्त कामगिरी करत धोनीच्या चेन्नईला पराभूत केलं आहे. राजस्थान रॉयल्सचा पंजाबविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात निसटता पराभव झाला आहे. मात्र संजू सॅमसनच्या आक्रमक खेळीचा इतर संघांनी धसका घेतला आहे. संजूने यंदाच्या आयपीएलमधील पहिलं शतक झळकावलं आहे.

दिल्लीचं कर्णधारपद ऋषभ पंतकडे आहे. तर राजस्थानचं कर्णधारपद संजू सॅमसनच्या हाती आहे. दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच आयपीएलमध्ये टीमचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी दोघांचा प्रयत्न असणार आहे.

संभाव्य टीम

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), मनन वोहरा, जोस बटलर, लियम लिविंगस्टोन, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमेयर, ख्रिस वॉक्स, आर. अश्विन, आवेश खान, कागिसो रबाडा/ टॉम करन, अमित मिश्रा

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Virat Kohli : विराट कोहलीला राग अनावर; विकेट गेल्यावर बॅटने खुर्ची उडवली

Stock Market | मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाकां 259 अंकांनी वधारून 48,803 वर बंद झाला