in ,

‘महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार’

महाराष्ट्राला दररोज २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारनं दररोज २६ हजार व्हायल्स देण्याचं परिपत्रक काढलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सीरमसोबत एका महिन्याचं प्रॉडक्शन केंद्र सरकारनं बुक केलं आहे. भारत बायोटेकसोबत लसींसाठी बोलणी सुरू आहे, असंही टोपे म्हणाले.

रेमडेसिवीर हा रामबाण उपाय नाही. रेमडेसिवीरचा सर्व ताबा भारत सरकारकडे आहे. ते ठरवतात कोणाला किती द्यायचं आहे. ऑक्सिजनचा कोटा वाटपही केंद्राकडेच आहे. त्यांनी तो अधिक द्यावा. केंद्रानं मदतीचा हात द्यावा. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी हात जोडायला आणि पाया पडायला तयार आहोत, असंही टोपे यांनी सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उधारी करा, भीक मागा, पण रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवा; हायकोर्टानं केंद्राला फटकारलं

मयुर शेळकेचे पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन