in

राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींची डॉक्टरांशी बातचीत

काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झालेला असून पुण्यातील जहांगीर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करत राजीव सातव यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केली आहे. २२ एप्रिलला राजीव सातव यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. “सौम्य लक्षणं जाणवल्यानंतर चाचणी केली असता आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियमांचं पालन करावं,” असं आवाहन त्यांनी ट्विटमधून केलं होतं.

पुण्यातील जहांगीर रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले होते. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली असून मुंबईमधील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला बोलावण्यात आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन करून जहांगीरमधील डॉक्टरांकडे राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. राहुल गांधी आणि डॉक्टरांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती अशी माहिती आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Update | देशात गेल्या २४ तासांत आढळले ३ लाख ७९ हजार रुग्ण

लोकांचा जीव जात रहावा असं सरकारचं धोरण दिसतयं; रेमडेसिविर धोरणावरुन न्यायालयाने केंद्राला सुनावलं