in

आ. राजू नवघरेंचा घोड्यावर चढून छत्रपतींना पुष्पहार; संभाजी बिग्रेडकडून कृतीचा निषेध

गजाणण वाणी, हिंगोली | वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा जिल्ह्यात दाखल होताच राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी घोड्यावर चढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मात्र या कृतीचा समाज माध्यमांवर निषेध होऊ लागलाय.

वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचधातूपासून बनवलेला पूर्णाकृती 14 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. 9 तारखेला जयपुर वरून वसमतकडे रवाना झाला होता. आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याच जिल्ह्यात आगमन होताच औंढानागनाथ शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

पुतळा वसमतमध्ये दाखल होताच राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी घोड्यावर जाऊन पुष्पहार अर्पण केला. मात्र या कृतीचा समाज माध्यमांवर निषेध होऊ लागलंय. संभाजी बिग्रेडने याबाबत आमदार राजू नवघरे यांच्या कृतीचा निषेध केला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Cruise Drug Case | आर्यन खानचा आजचा मुक्कामही आर्थर रोड जेलमध्ये

Sinhagad Express सोमवारपासून धावणार