in

शेतकरी नेते राकेश टिकैत ममता बॅनर्जींच्या भेटीला

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात यावेळी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकी आधीच राकेश टिकैत यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा देत असल्याचे सांगितले होते. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ममत बॅनर्जी देखील मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी बॅनर्जी यांनी केली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Euro Cup 2021 स्पर्धेचे वेळापत्रक आले समोर

एसटी बस चालकाचे नियत्रंण सुटल्याने अपघात