in

ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली, त्यांचीच नियत ढळली – स्वामी दिलीप दास

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. राम मंदिरासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जमीन खरेदी केली. हे जमीन खरेदी प्रकरण वादाचा विषय ठरला आहे. आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभेतील खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते कल्याण पांडे यांनी जमीन खरेदी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर खळबळ उडाली. यावर ट्रस्टने खुलासा केला आहे. मात्र, आता रघुवंश संकल्प सेवा ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी दिलीप दास यांनी रविवारी झालेल्या संतांच्या बैठकीत संताप व्यक्त केला. त्याचबरोबर या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर संतांमधून नाराजीचा सूर उमटला आहे. रविवारी अयोध्येतील भागवताचार्य सदनात संतांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत रघुवंश संकल्प सेवा ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी दिलीप दास यांनी हा मुद्दा उचलून धरत संताप व्यक्त केला.

‘ज्या प्रभूरामासोबत हे विश्वासघात करत आहेत, तो राजाराम नाही. तो योद्धा रामही नाही. हा तर बालक राम आहे. अबोध राम आहे. जो बोलूही शकत नाही. पण, ज्यांना या बालकाच्या संगोपनाची जबाबदारी मिळाली, त्याच्याच भूमीवर नियत खराब झाली आहे. त्यामुळे हे लोक या बालकाच्या भविष्यासोबत काय करू शकतात? याचा निर्णय आपण स्वतः करावा,’ असं आवाहन दिलीप दास यांनी उपस्थित साधूंना केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लसीकरणाबाबत केंद्राकडून योग्य नियोजन झाले असते,तर…; हसन मुश्रीफ

‘चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसविलं अन् फडणवीसांचं राज्य आलं’