in ,

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. यावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लवकरच पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्फोटक प्रकरणाची मुंबई पोलिसांनी योग्य चौकशी केली नाही. त्यामुळे ही चौकशी एनआयएकडे गेली. वाझे यांची अटक ही मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासणारी बाब आहे. मुकेश अंबानी यांचे घर उडविण्याच्या षडयंत्रामागे कुणाचा हात आहे, याची सखोल चौकशी व्हावी, असे रामदास आठवले म्हणाले. सचिन वाझे यांना राज्य सरकारने संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. एनआयएने चौकशी केली नसती तर, राज्य सरकारने सचिन वाझे प्रकरण दडपून टाकले असते, असा आरोपही त्यांन केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत कोरोनाचा उद्रेक; रुग्णसंख्या 3 हजारावर

World Sleep Day | जाणून घ्या झोपेचे शरीराला होणारे फायदे