शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. कदम यांनीची आपल्या अधिकृत सोशल नेटवर्किंग पेजवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान आठवड्यापूर्वीच त्यांनी कोरोनाची लस घेतली होती.
रामदास कदम यांची पोस्ट ?
प्रकृती ठीक वाटत नसल्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालो आहे. तसेच, आता सर्व काही ठीक असून योग्य ते उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.तसेच कदम यांनी त्रिसूत्रीचे पालन करून सर्वांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान रामदास कदम यांनी २२ तारखेला कोरोना लसीचा पाहिला डोस घेतला होता तरी त्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
Comments
Loading…