in

Ramnath Kovind Health | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावरील बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

शुक्रवारी छातीत दुखल्यामुळं राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी आर्मी रुग्णालयात गेले होते. नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून राष्ट्रपतींच्या तब्बेतीची माहिती दिली आहे.
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर दिल्ली तील एम्स रुग्णालयात यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. शनिवारीच राष्ट्रपती कोविंद यांना ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) दिल्ली येथे दाखल करण्यात आले होते. ज्या ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं ठरलं होतं.

मी यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉक्टरांच्या चमूचं अभिनंदन करतो. ‘एम्सच्या संचालकांशी संवाद साधून मी राष्ट्रपतींच्या आरोग्याची चौकशी केली. आता त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो’, असं ट्विट राजनाथ सिंह यांनी केलं.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bollywood Actor Ajaz Khan arrested| शादाब बटाटाने तोंड उघडलं, अभिनेता एजाझ खान NCB च्या ताब्यात

राज्यात महाविकास आघाडी सरकार काँग्रेसमुळे; नाना पटोलेंचे खळबळजनक वक्तव्य