in ,

रणबीर कपूरला कोरोनाची लागण!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आजारी आहे. अशी माहिती समोर येत आहे, की आई नीतू कपूरनंतर आता रणबीरलाही कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता सध्या क्वारंटाईन असून आराम करत आहे. रणबीरच्या आजारपणाबद्दलची बातमी समोर आल्यानंतर रणधीर कपूर यांनी याबद्दलची खरी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं, की ही गोष्ट खरी आहे, की रणबीर सध्या आजारी आहे.

कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे, मात्र कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रणबीरलाही कोरोनाची लागण झाली आहे.

याबद्दल जेव्हा रणबीरचे चुलते रणधीर कपूर यांना विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, की रणबीरची तब्येत ठीक नाही. मात्र, त्याला कोरोना झाला आहे, की नाही हे माहिती नाही. ते पुढे म्हणाले, की मी सध्या शहराच्या बाहेर आहे. यानंतर आता चाहत्यांनी आलिया भट्ट आणि अयान मुखर्जीसाठीही काळजी व्यक्त केली आहे. कारण नुकतंच आलिया आणि अयान दोघंही ब्रह्मास्त्रच्या सेटवर रणबीरसोबत होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Thane Lockdown | ठाण्यातील १६ भागांमध्ये आजपासून लॉकडाउन

10 महिन्यात देशातील 10 हजार 113 कंपन्यांना लागलं टाळं