in

Deepali Chavan Suicide;निलंबित मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसालच्या वनअधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेला निलंबित मुख्य वनरक्षक अधिकारी श्रीनिवास रेड्डी याला 14 दिवसांची न्यायालयायीन कोठडी सूनावली आहे. धारणीच्या न्यायालयाने हा निकाल दिला.

दिपाली चव्हाण प्रकरणात सह आरोपी असलेल्या श्रीनिवास रेड्डीला गुरुवारी धारणी पोलीसांनी नागपूरातून अटक केली होती.त्यानंतर त्याला गुरुवारीच न्यायालयात दाखल केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.दरम्यान दोन दिवसाच्या पोलीस कोठडी नंतर बऱ्याच गोष्टीचा उलगडा पोलिसांनी केला मात्र यात काही माहिती रेड्डींनी पोलिसांना दिली का याची माहिती कळू शकली नाही…दरम्यान श्रीनिवास रेड्डीला जामीन मिळावी यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले.

दरम्यान आज त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सूनावली आहे.त्यामुळे आता रेड्डीला जेलची हवा खावी लागणार आहे..

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्यभर पडसाद उमटले होते रेड्डीच्या अटकेची मागणी जोर धरू लागली होती.तर घटनेच्या 26 दिवसांनी त्याला अटक करण्यात आली होती.यापूर्वी घटने दुसऱ्या दिवशीच 26 मार्च रोजी उपवनक्षक विनोद शिवकुमार याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती तर शिवकुमार हा आरोपी सुद्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे,त्यामुळे दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्याला जबाबदार असणारे दोन्ही आरोपी आता जेल मध्ये आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MU Vs CSK | कांटे की टक्कर; मुंबईची चेन्नई विरुद्ध लढत

Kerala Election 2021: Check exit poll result date and time