in

तुम्ही चोऱ्या करता म्हणून धाडी पडतात, रावसाहेब दानवेंचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

कमलाकर बिरादार , नांदेड | आम्ही धाडी टाकायला लावल्या असं काँग्रेस ,राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर आम्ही धाडी टाकल्या असत्या का अश्या शब्दात केंदीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली. देगलूर विधानसभा पोटनिवडनूकीत भाजपा उमेदवार सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला . त्यानंतर आयोजित जाहिर सभेत दानवे बोलत होते.

आम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर आम्ही धाडी टाकल्या नसत्या… अशी टीका भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केली. अडचणीत आलेले साखर कारखान्यांने वाचविण्याचे काम राज्य सरकारचे होते असं वक्तव्य ही दानवेंनी केलं. भुईमुगाला शेंगा खालून की वरुन हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही… त्यांना फक्त उपटून आणलेल्या शेंगा माहिती आहेत अशी बोचरी टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर केली.दरम्यान तुमच्यात दम असेल तर एकट-एकट येऊन आमच्याशी लढा, असे आव्हान रावसाहेब दानवे यांनी दिलय.

घोटाळेबाज सरकार -शेलार

दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील धाडीवरून कॉंग्रेस नेत्यांवर टीका केली. हे सरकार दलालांनी चालवलेलं सरकार आहे अशी घणाघाती टिका भाजप नेते आशिष शेलार यांनी केलीय.राज्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हेतीन पक्षाचे सरकार म्हणजे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असल्याची टीका ही शेलार यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माफी मागा, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांना कायदेशीर नोटीस

रत्नागिरीत एकाचवेळी 21 कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू