in

नॊकरीचे आमिष दाखवून बलात्कार; बोगस पत्रकारा विरोधात गुन्हा दाखल

भिवंडी तालुक्यात नॊकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच संबंधित आरोपीने महिलेला जातिवाचक शिवीगाळ हि केली होती. या प्रकरणी नारपोली पोलीसांनी एका बोगस पत्रकारा विरोधात बलात्कार व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून अटक केली.

भिवंडी तालुक्यातील पुर्णा येथे राहणारा मनोहर विशे हा ग्रामीण भागात पत्रकार म्हणून वावरत असतानाच त्याने एका 35 वर्षीय पीडित महिलेस तुला नोकरी लावून देतो व तुझ्याशी लग्न करतो असे आश्वासन देवून पीडितेच्या इच्छेविरूध्द शारिरीक संबंध करून 2016 पासून वज्रेश्वरी व इतर ठिकाणी पीडितेवर बलात्कार केल्याची व त्यानंतर पीडितेने नोकरी व लग्नासाठी तगादा लावला असता तिला जातीवाचक शिवीगाळ करीत धमकविल्या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी पीडितेच्या तक्रारीवरून मनोहर विशे या विरोधात भादवी कलम 376 (2) व अट्रोसिटी कायदा कलम 3(1) (डब्ल्यु) नुसार बलात्कार व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली आहे .या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले हे करीत आहेत .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भरधाव ट्रकची बैलगाडीला धडक; सहा शेतकरी गंभीर जखमी

राज्यातील पूरग्रस्तांना MIDC कडून मदत.