in ,

Fire Eclipse: आज 10 जूनला दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतातल्या ‘या’ मोजक्या शहरात दिसणार

वर्षातले पहिले सूर्यग्रहण आज १० जून रोजी होणार आहे. जरी हे पूर्ण सूर्यग्रहण असले तरी भारतात ते अर्धवट स्वरूपात दिसणार आहे. हे सूर्यग्रहण सूर्यास्ताच्या आधी फक्त अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्येच दिसणार आहे.

ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार हे सूर्यग्रहण १४८ वर्षांनी जेष्ठ अमावस्येला दिसणार आहे. आज गुरुवारी १० जून रोजी हे ग्रहण लागणार आहे. भारतात अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्येच हे ग्रहण दिसणार असून उत्तर अमेरिका, उत्तर कॅनडा, युरोप आणि आशिया, ग्रीनलँड, रशियाच्या बऱ्याचश्या भागांमध्ये दिसणार आहे. कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियामध्ये अंगठीच्या आकाराप्रमाणे दिसणार आहे. तर उत्तर अमेरिका, युरोप आणि उत्तर आशियाच्या बर्‍याच भागांत हे केवळ अर्धवट स्वरुपात दिसेल.

किती वाजता पाहता येणार

‘कंकणाकृती‘ सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार आज दुपारी १.४२ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६.४१ वाजता संपणार आहे. अरुणाचल प्रदेशातील दिबंग वन्यजीव अभयारण्याजवळून संध्याकाळी ५:५२ वाजता हे सूर्यग्रहण पाहता येणार आहे. तर लडाखच्या उत्तरेकडील भागात ते संध्याकाळी ६ च्या सुमारास दिसेल.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

यंदा आषाढी वारी कशी होणार? मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात; खबरदारीसाठी NDRFची टीम तैनात