in

रश्मी शुक्लांनीही देशमुखांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला; परमबीर सिंहाचा याचिकेत दावा

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढतच चालल्या आहेत. आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचारांची नि:पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर रश्मी शुक्ला यांनी अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती तत्कालिन पोलीस महासंचालकांना दिली असल्याचा दावा देखील
परमबीर सिंग यांनी याचिकेत केला आहे.

अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत निष्पक्ष आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी करावी. तसेच पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे आवश्यक असल्याचे याचिकेत परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.
देशमुखांनी फेब्रुवारी 2021 मध्ये वरिष्ठांना डावलून एसीपी सचिन वाझे आणि एसीपी संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत दोघा पोलिसांना महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट देण्यात आल्याचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गृहमंत्र्यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करुन पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना दिल्या असल्याचा आरोप केला. तसेच परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची विनंतीही सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.

विशेष म्हणजे या याचिकेत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अपर महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झालेल्या महासंचालक रश्मी शुक्ला यांचा संदर्भ देत मोठा खुलासा केला. 24 की 25 ऑगस्ट 2020 मध्ये रश्मी शुक्ला, ज्या राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त होत्या, त्यांनीही पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी याप्रकरणात अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवारांना दोन प्रकरणे प्रथमदर्शनी वाटली गंभीर, पण नंतर…

अमिर खानच्या मुलीला ‘या’ कारणासाठी हवे आहेत इंटर्न्स