मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या गंभीर आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याच वादात आता आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत आहेत. या चर्चेमागचे कारण म्हणजे त्यांनी सादर केलेल्या एका अहवालात पोलीस बदलीचं रॅकेट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
रश्मी शुक्ला यांनी 2019 मध्ये सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी भाजपाच्या विरोधात असणाऱ्या राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला जातोय. त्याचसोबत त्यांनी दिलेल्या एका अहवालाने राज्यात मोठा भूकंप झाला आहे. या अहवालात त्यांनी पोलीस बदल्यांमधील घोटाळ्याचा गौप्यस्फोट केला आहे.
अहवालात काय?
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी 20 ऑगस्ट 2020 ला एक अहवाल तयार केला होता. हा अहवाल 25 ऑगस्ट 2020 ला पोलीस महासंचालकांसमोर सादर केला होता. त्यांनतर 26 ऑगस्टला अहवाल गृहखात्याला पाठवण्यात आला. या अहवालात महादेव इंगळे यांचे नाव समोर आले होते. हा इंगळे पोलीस प्रशासनातील बदल्यांचे रॅकेट चालवायचा. यामध्ये एका बदलीसाठी 35 ते 40 लाखांची रक्कम स्वीकारली जात असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. अहवालात 29 पोलीस अधिकाऱ्यांची नावे समोर आली असून यामध्ये 6 अधिकारी IPS दर्जाचे तर इतर अधिकारी ACP, DCP, SP, Dy.SP दर्जाचे आहेत. विशेष म्हणजे यामध्ये इंगळे गृहमंत्री आणि दादांमार्फत ही बदली करून घ्यायचा. तसेच पोलीस दलच नव्हे तर इतर महत्वाच्या विभागातील बदल्यांचे काम हा इंगळे करत होता.
Comments
Loading…