in

रश्मी ठाकरेंना रिलायन्स रुग्णालयात केलं दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी रश्मी यांना रुटीन तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाची झळ आता थेट मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. आदित्य ठाकरेंनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांना रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी क्वारंटाइन केलं होतं.

रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत ११ मार्चला कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. क्वारंटाइन राहिल्यानंतर आता त्यांना पोस्ट कोव्हिड उपचारासाठी रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंहांच्या गृहमंत्र्यांवरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठीत

ड्रग्जप्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक