in

RBI चे पतधोरण जाहीर, व्याजदर जैसे थे!

भारतात करोनामुळे (corona crisis) अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटाचा सामना कसा करावा हा मोठा प्रश्न सरकार आणि प्रशासनासमोर होता. मात्र, लसीकरणाचा (corona vaccination) वेग हळूहळू वाढू लागल्यामुळे अर्थव्यवस्था (Economy) देखील काहीशी पूर्वपदावर येऊ लागली आहे.

आता रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट अर्थात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या द्विमासिक आढावा बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरणाविषयी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. यानुसार, देशातील रेपो रेट ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, रिव्हर्स रेपो रेट देखील ३.३५ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. याआधी देखील ६ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये देखील हे व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
देशातील अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या अधिकारांतर्गत देशातील बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे आणि त्यांच्या ठेवींवरील व्याजदर नियंत्रित करत असते. यामध्ये बँकांना दिलेल्या कर्जावरील व्याजदरांना रेपो रेट असं म्हणतात. बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे ठेवलेल्या ठेवींवर जे व्याज रिझर्व्ह बँक इतर बँकांना देते, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. या पैशातूनच बँका कर्जवाटप करत असतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आर्यनची अवस्था पाहून ‘या’ व्यक्तीला अश्रु अनावर

देशातील रेल्वे स्थानकांची विक्री करून खासगीकरण करण्यात केंद्राला सर्वाधिक रस, शरद पवारांचा मोदींवर घणाघात