in

SRH vs RCB | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सनरायझर्स हैदराबादशी आज भिडणार

आयपीएलच्या आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लढणार आहे. चेन्नईतील एमए चिदम्बरम स्टेडिअमध्ये हा सामना रंगणार आहे.

विराटच्या नेतृत्वाखालील बंगळुरु संघ पहिला सामना जिंकला आहे. बंगळुरुने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केले आहे. त्यामुळे विराटसेनेचं मनोबल चांगलंच वाढलं आहे. तर हैदराबादला कोलकाताकडून पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे पहिला विजय मिळवण्यासाठी हैदराबाद संघाची धडपड असणार आहे.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 18 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी 10 सामने डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबादने तर 7 सामने विराटच्या आरसीबीने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. या 18 सामन्यांमध्ये आयपीएल 2016 च्या अंतिम सामन्याचादेखील समावेश आहे. या सामन्यात हैदराबादने बंगळुरुवर मात करत दुसऱ्यांदा आयपीएल चषक उंचावला होता.

संभाव्य संघ

सनराइजर्स हैदराबाद: डेविन वॉर्नर (कर्णधार), वृद्धिमान साहा, जॉनी बेअरस्टो, मनिष पांडे, मोहम्मद नबी, विजय शंकर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी नटराजन, संदीप शर्मा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलिअर्स, रजत पाटीदार, वॉशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, काइल जेमिसन, डॅनिअल ख्रिश्चियन, यजुवेंद्र चहल

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही, ही अस्मितेची लढाई”

Pandharpur Bypoll | घरची आणि पक्षाची जबाबदारी सोबतच… सुप्रिया सुळेंचं रुग्णालयाबाहेरून भाषण