in

महागाईचा डबल वार! रिचार्जनंतर आता स्मार्टफोन देखील महागले

Realme C21 2021 Price In India Realme नं आपल्या लोकप्रिय स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. आजपासून मोबाईल जियोचे रिचार्ज प्लॅन महागणार आहेत.आता रियलमीनं Realme C11 2021 या बजेटमधील स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. Realme C11 2021 चे दोन व्हेरिएंट भारतात उपलब्ध आहेत.

जूनमध्ये लाँच झालेल्या या फोनच्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत कंपनीनं वाढवली आहे. या डिवाइसचा 2जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज व्हेरिएंट 7,300 रुपयांच्या ऐवजी 7,500 रुपयांमध्ये विकत घ्यावा लागेल.तर 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज व्हेरिएंट 200 रुपयांच्या दरवाढीनंतर 9,000 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.हा बदल ऑफलाईन विक्रीसाठी आहे कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हा फोन अजूनही जुन्या किंमतीत उपलब्ध आहे.


वैशिष्ट्ये :
▪️ Realme C11 (2021) मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे.
▪️ या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1600×720 पिक्सल इतके आहे.
▪️ स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा एक रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
▪️ हा कॅमेरा 4x डिजिटल झूमला सपोर्ट करतो.
▪️ सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
दरम्यान, या बॅटरीच्या मदतीने इतर फोन्स देखील चार्ज करता येतात, कारण यामध्ये रिवर्स चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोकण किनाऱ्यावर अवकाळी पाऊस, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

मोठी बातमी ! देशात ओमिक्रॉनचे 2 रूग्ण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती