in ,

“चौफुला – केडगाव – न्हावरा” राज्यमार्गाला ‘राष्ट्रीय महामार्ग’ म्हणून मान्यता

दौंड(विनोद गायकवाड) : चौफुला – केडगाव – न्हावरा रस्ता राज्य मार्ग – ११८ (किमी १६-८०० ते ४१-७०० लांबी २४.९ किमी) रस्त्याचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली होती.पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे तळेगाव – चाकण – शिक्रापूर – न्हावरा- चौफुला चौक रस्ता ज्यामध्ये शिक्रापूर न्हावरा रस्ता राज्य मार्ग ५५ (किमी – ५३-०० ते ८१-४००) आणि न्हावरा – केडगाव – चौफुला राज्य मार्ग ११८ (किमी १६-८०० ते ४१-७०० लांबी २४.९ किमी) आदींचा समावेश होता परंतु सुधारित नियोजनानुसार राज्य मार्ग ५५ तळेगाव – चाकण – शिक्रापूर – न्हावरा – इनामगाव – काष्टी असा करून तो राष्ट्रीय महामार्ग – १६० यांना जोडण्याचा निर्णय शासनाने घेतला व चौफुला – केडगाव – न्हावरा राज्य मार्ग ११८ ला यातून वगळून या रस्त्याचा समावेश चा ‘भारतमाला प्रकल्पात समावेश करण्यात आला होता.

भारतमाला प्रकल्पात समावेश केलेल्या चौफुला – केडगाव – न्हावरा राज्य मार्ग ११८ मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा नसल्याने या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु होऊ शकले नाही तसेच राष्ट्रीय महामार्ग – ९ (पुणे – सोलापूर महामार्ग) वरील वाहतुकीचे प्रमाण कमी करण्यासाठी, सोलापूर व मराठवाडा ते मुंबई, पुणे – मुंबई, पुणे – नाशिक, पुणे – अहमदनगर, पुणे – सोलापूर आणि पुणे – सातारा यांना जोडण्यासाठी चौफुला – केडगाव – न्हावरा राज्य मार्ग ११८८ हा भाग विविध राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून हा रस्ता विशेष महत्वाचा आहे हि बाब आमदार कुल यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली व चौफुला – केडगाव – न्हावरा राज्य मार्ग ११८ या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता मिळावी यासाठी दिल्ली दरबारी यशस्वी पाठपुरावा केला.

“चौफुला – केडगाव – न्हावरा” राज्य महामार्गाला ‘राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ – डीजी’ म्हणून मंजुरी दिल्याचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच जाहीर केले असून, सदर रस्त्याचा समावेश वार्षिक अहवालामध्ये करून पुढील कार्यवाहीच्या सूचना राष्ट्रीय रस्ते प्राधिरणास दिल्याचे गडकरी यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल

आणखी 7 दिवस मान्सूनचे वारे; हवामान खात्याचा अंदाज