in

मुंबईसह, कोकणात रेड अलर्ट तर या 8 जिल्ह्यांत आज ऑरेंज अलर्ट

पुढील 24 तासात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर मुंबई , ठाणे, पालघर, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील चार दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट असणार आहे. 23 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, उपनगरांसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत.

कोकण विभागातील मुंबई आणि इतर जिल्ह्यांत भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) ‘रेड अलर्ट’ बजावला असून येत्या 24 तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माजी खासदार राजू शेट्टी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

पंतप्रधान मोदी यांचं मराठीमध्ये ट्विट