in

Monsoon Alert | कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड ॲलर्ट

सतत पडणाऱ्या पावसाने राज्याला झोडपले आहे. पावसाच्या पाण्यामुळे सर्वत्र हाहाकार माजवला आहे. कोकणातील चिपळूणमध्ये पावसाच्या पाण्यामुळे दरड कोसळली आहे. तर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यात अनेक वाहने वाहून जात आहेत. तर दुसरीकडे मुंबईत कल्याणमधील उल्हास नदीला पूर आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबईकडून राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी कोकणात 2 ते 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात अनेक ठिकाणी पूरस्थितीनिर्माण होऊ शकते, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

हवामान विभागानं आजच्या दिवसासाठी रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. उस्मानाबाद, धुळे, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना येलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; सतर्क राहून बचावकार्य करण्याचे आदेश

Pegasus Spyware | ”मोदी सरकार देशात हुकुमशाही आणतेय”; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल