in

‘बघ समाजा व्यथा वेश्येची’ अस राजेश्वरी खरात का म्हणतेय ?

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची जोडी खूप गाजली, हीच राजेश्वरी आता एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय, तिने ‘रेडलाईट’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर आपल्या सोशल मिडिया वर पोस्ट केलय. पोस्टर टाकताना तिने एक मेसेज देखील दिला आहे, ‘सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा’ पण माझे अश्रू विकत घेऊ शकतोस का? बनते एक स्त्री वेश्या, पण खरच स्वईच्छेने का? प्रश्न हा सोडवून बघ समाजा, कळेल मग व्यथा वेश्येच्या मागच्या स्त्री ची तुला! ‘ असा एक संदेश पोस्टर सोबत शेअर केला आहे,

‘रेडलाईट’ सिनेमाचं दिग्दर्शन अनमोल मुनगंटीवार यांनी केल आहे तर निलेश नगरकर यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. ही साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत असते,राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत. ‘रेडलाईट’ या सिनेमातला लूक पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय,

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Anil Deshmukh | ठाकरे सरकारसह अनिल देशमुखांना मोठा धक्का; ‘त्या’ याचिका फेटाळल्या

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; सतर्क राहून बचावकार्य करण्याचे आदेश