in

आज ४ वाजल्यापासून सुरु होणार लसीकरणासाठीची नोंदणी; जाणून घ्या कशापद्धतीने करायचं रजिस्ट्रेशन

केंद्र सरकारने नुकतीच १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची घोषण केली आहे. त्यानुसार येत्या १ मे पासून हे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी २८ एप्रिलपासून म्हणजे आज दुपारी चार वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आधीप्रमाणेच कोविन अॅपवर ही नोंदणी करता येणार आहे.

लसीकरणावेळी आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. तुमचा मोबाइल क्रमांक आधारकार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. या टप्प्यात लस घेण्यासाठी नाव नोंदणी कशी करायची जाणून घेऊयात…

कशी कराल लसीकरणासाठी नोंदणी?

  1. cowin.gov.in संकेतस्थळावर जा आणि तुमचा मोबाईल क्रमांक टाका
    २. मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या जागेत भरून Verify वर क्लिक करा.

३. ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर व्हॅक्सिनसाठीच्या नोंदणीचं पेज उघडेल. इथे तुमची माहिती भरा आणि Register वर क्लिक करा.

४. तुम्हाला मोबाईलवर नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील. या पेजवर तुम्ही लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडू शकता.

५. एका मोबाईल क्रमांकावर एकूण ४ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्याची परवानगी असेल. यासाठी नोंदणी करताना सर्व सदस्यांची माहिती भरणं आवश्यक असेल.

६. आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून देखील तुम्हाला नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी अ‍ॅपवर स्वतंत्र लिंक देण्यात आली असून तिथे नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग अशी माहिती भरून नोंदणी करता येऊ शकेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘सर्व रुग्णालयातील फायर सेफ्टी ऑडिटच्या सूचना दिल्या’

काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन