in ,

रेमडेसिवीर कोरोनावर परिणामकारक असल्याचा पुरावा नाही – WHO

महाराष्ट्रासह इतर काही राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. अनेकांना रेमडेसिवीर मिळवण्यासाठी कष्ट करावे लागत आहेत. काही ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरानं विकल्या जात आहे. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाची माहिती दिली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

अलीकडेच यासंदर्भात ५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातून हे पुढं आलं आहे की, कोरोना मृत्यू रोखण्यासाठी किंवा व्हेंटिलेशनमध्ये घट करण्यात रेमडेसिवीरच्या वापरामुळे कोणतीही मदत होत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

रुग्णालयात उपचाराधीन रुग्णांवर रेमडेसिवीरच्या उपचाराबद्दल सशर्त शिफारस केली आहे. पुराव्यांचा अभाव असला तरी रुग्णांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते. मात्र, सध्या रेमडेसिवीरच्या चाचण्या सुरू असून त्याच्यावर आमचं लक्ष आहे, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या दीड लाखांहून अधिक

Remedesivir | अहमदनगर जिल्ह्यातील म्हस्के हॉस्पिटलवर छापा