in ,

अक्षय कुमार याच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाचे नाव बदला

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत सिनेमाचे नाव बदलण्याची मागणी करणी सेनेने केली आहे. अशावेळी सिनेमाचे नाव पृथ्वीराज ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सिनेमाचे नाव बदलण्याची आमची मागणी करण्यात आल्याचे करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते सुरजीत सिंह राठौड यांनी म्हटले आहे.

तसंच सिनेमात त्यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख करुन नाव बदलून सन्मानार्थ नाव ठेवण्यात यावे, असेही ते म्हणाले. इतकंच नाही तर सिनेमा रिलीज करण्यापूर्वी आम्हाला दाखवण्यात यावा आणि जर आमचे म्हणणे मानले नाही तर याचे परिणाम भोगण्यास तयार रहा, असा इशाराही सुरजीत सिंह यांनी दिला आहे. तसंच पद्मावतच्या वेळी झालेल्या वादाची आठवण करुन देत या सिनेमाच्या निर्मात्यांनाही त्यासाठी तयार रहावे लागेल, असंही सेनेने म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गंगेतील मृतदेहांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला गंभीर आरोप

मुंबईत Metro 2A आणि Metro 7 ची आज होणार चाचणी