in

रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर, व्याजदरात बदल नाही

रिझर्व्ह बँकेने व्याज दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतलाय आहे. आरबीआयने घर आणि वाहन कर्ज घेणाऱ्यांना कोणतीही सवलत दिलेली नाही. तर आरबीआयने व्याज 4 टक्के कायम ठेवलाय. त्यामुळे गृह आणि वाहन कर्जावरील ईएमआय जवळच्या काळात कमी होण्याची शक्यता नसल्याने शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या जाहीर केलेल्या पतधोरणाच्या आढाव्यात स्पष्ट झाले आहे. मुख्य धोरण दर बदलले नाहीत. दरम्यान,अनेक तज्ज्ञांनी कोरोनाचा काळ पाहता RBI व्याजाच्या दरात काहीही बदल करणार नाही, असे म्हटले होते.


जून आणि जुलै महिन्यासाठी पतधोरण निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठकी आयोजित केली होती. यानंतर द्विमासिक पतधोरणाची घोषणा करण्यात आली आहे. ही बैठक मुंबईत पार पडली. रेपो दर किंवा बँकांशी समंधित अन्य बाबतीमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केलं आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वृक्षवल्ली अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम

Global Tender; मुंबई महापालिकेचे ग्लोबल टेंडर रद्द