in

सायन रुग्णालयाबाहेर मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन, नीट पीजी काऊन्सिलिंग पुढे ढकल्यामुळे आक्रमक

देशाबरोबरच मुंबईमध्येही ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असतानाच, मुंबईमधील शीव येथील शासकीय रुग्णालयाबाहेर मार्डच्या निवासी डाॅक्टरांनी आज सकाळपासून आंदोलनाला सुरुवात केली. नीट पीजी काऊन्सिलिंग सतत पुढे ढकलण्यात येत असल्याने निवासी डाॅक्टरांनी संपाचं हत्यारं उपसलं आहे. डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत मागण्या पूर्ण करण्यासाठी आता काम बंद आंदोलनाची हाक दिली.

राज्यातील सरकारी रुग्णालये आणि काॅलेजमधल्या बाह्यरुग्ण विभागातील डाॅक्टरांनी आजपासून हे आंदोलन सुरु केल. सरकारच्या धोरण निश्चिततेमध्ये समानता नसल्याने आपलं शैक्षणिक नुकसान होत असल्याने सोबतच ॲडमिशन प्रक्रिया लवकर पार पडत नसल्याने रुग्णालयातील इतर डाॅक्टर्सवर ताण येत असल्याने आक्रमक पवित्रा घेत हे आंदोलन सुरु करण्यात आल्याचं संपकरी डॉक्टरांनी म्हटलंय. सरकारी रुग्णालये आणि मेडिकल काॅलेजमधील इमर्जन्सी सेवा आणि ओपीडी बंद राहणार असल्याने रुग्णांचे हाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs NZ 2nd TEST | भारतानं जिंकली मुंबई कसोटी, न्यूझीलंडचा 372 धावांनी दणदणीत पराभव

Mahaparinirvan Din | प्रवेश नाकारल्याने चैत्यभूमीवर समर्थक भिडले