राज्यात कोरोनाचा वाढता आलेख पाहता मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकलवर पुन्हा एकदा निर्बंध येण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांच्या चिंतेत भर पडणार असून प्रवासास मुकावे लागण्याची शक्यता आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी नियम पाळले पाहिजे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे. पण लोकांनी नियम पाळले नाहीत तर लोकलबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील”, असं राजेश टोपे म्हणाले
दरम्यान अद्याप तर लोकल ट्रेनवर निर्बंध आणण्यात आले नाही आहेत. मात्र जर असाच रुग्णसंख्येचा आकडा वाढत राहीला तर प्रशासन लोकल ट्रेनवर निर्बंध आणण्याची शक्यता आहे.
Comments
Loading…