in

‘या’ अभिनेत्रीच्या आईचे कोरोनामुळे निधन

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री रिद्धिमा पंडित हिच्या आईचेही कोरोनाने निधन झाले आहे. रिद्धिमाच्या आई ६८ वर्षांच्या होत्या याबद्दल रिद्धिमाने सोशल मीडियावर पोस्ट करत दु;ख व्यक्त केले आहे.

“मम्मा, मॉझी, छोटी बेबी, अशीच मी तुला हाक मारायचे. मी तुला खूप जास्त मिस करत आहे.तुझं नाव आता माझ्या फोनवर फ्लॅश होणार नाही. औषधं घेतली नाहीत म्हणून किंवा वेळेवर नीट जेवली नाहीस म्हणून आता मी तुला ओरडू शकणार नाही. स्वतःला त्रास होत असतानाही आयुष्यातली शेवटची पाच वर्षे तू फक्त माझ्यासाठी जगलीस. मला माहित आहे तू सदैव माझ्या सोबत असशील, अशा भावना रिद्धिमाने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.

रिद्धिमा ‘बहु हमारी रजनीकांत’ या मालिकेतून प्रसिद्ध झाली होती. २०१९ साली ती ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये सहभागी झाली होती आणि फायनलपर्यंतही पोहोचली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वाचा , देशातील कोण कोणत्या राज्यात आहे लॉकडाऊन / नाईट कर्फ्यू

Anil Deshmukh |अनिल देशमुख यांना CBI चे समन्स