in

रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी चित्रपटात दिसणार …

अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी चित्रपटात दिसणार आहे लय भारी, माउली, या मराठी चित्रपटांमध्ये बहारदार अभिनय केलेला रितेश पुन्हा एकदा मराठी चित्रपटाकडे वळला आहे. अदृश्य या चित्रपटात तो दिसणार आहे. बॉलिवूडमधले प्रसिध्द कॅमेरामन काबिरलाल या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत, या चित्रपटात पुष्कर जोग, मंजिरी फडणीस हे कलाकार देखील दिसणार आहेत,

महत्वाच म्हणजे कबीर लाल आणि रितेश २० वर्षांनंतर एकत्र कामं करत आहेत. तुझे मेरी कसम या रितेशच्या पहिल्या चित्रपटाचे कॅमेरामन कबीर लाल होते. मी चित्रपटांत काम करत आहे याचं कारण कबीर लाल हेच आहेत. सुभाष घई दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटाच्या सेटवर मी शूटिंग बघायला गेलो होतो. त्यावेळी माझी आणि कबीर यांची भेट झाली. तुझे मेरी कसम या चित्रपटासाठी त्यांनी माझं नाव सुचवलं आणि त्याच चित्रपटानं माझ्या करिअरची सुरुवात झाली. २० वर्षांनंतर त्यांच्याबरोबर काम करताना खूप छान वाटत आहे.’अदृश्य या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून लवकरच प्रदर्शित होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पोलीस शिपायाच्या प्रसंगावधाने वाचले प्राण

महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार; राहूल गांधीसोबतच्या बैठकीनंतर पटोलेंचे वक्तव्य