in

शेतातील माल बाजारात पोहोचविण्यासाठी रस्ते योजना

शेतातील माल बाजारात पोहोचविण्याकरीता तसेच शेतापर्यंत जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी मातोश्री पाणंद रस्ते योजना राबविण्यात येणार आसल्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी बोलतांना सांगितले. पैठण तालुक्यातील आनंदपुर येथे शिवसंपर्क अभियान व विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

मातोश्री पाणंद रस्ते हि योजना हि शेतकऱ्यांसाठी ठरेल,असा विश्वास भुमरे यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू नाना भुमरे , महानंद दूध संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नंदलाल काळे , माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य विलास बापु भुमरे, तालुका प्रमुख अण्णासाहेब लबड़े ,नाथ संस्थानचे दादा पाटील बारे, युवासेनेचे जिल्हाधिकारी किशोर चौधरी,अशोक फासाटे,नामदेव खराद, पुष्पा गव्हाणे,माजी नगरअध्यक्षा राखीताई परदेशी,ज्योतीताई काकडे, शाम काळे, विनोद खराद
चेअरमन ज्ञानेश्वर चिंधे, सरपंच संगिता विनोद खराद उपसरपंच, मिरा ज्ञानेश्वर चिंधे, ग्रामविकास अधिकारी सागर डोईफोडे,तलाठी कावळे मॅडम यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चिपळूणसह खेर्डी जलमय; २००५ पेक्षा भयंकर परिस्थिती

चिपळूणमध्ये ढगफुटी; मुंबई – गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प