in

रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक व्ही’ लस लवकरच भारतात दाखल होणार

कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा मिळणार आहे. रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक व्ही’ लशीची पहिली खेप भारतात दाखल होणार आहे. येत्या एक मे रोजी लस भारतात दाखल होणार असल्याची माहिती रशियन थेट गुंतवणूक निधीचे (आरडीआयएफ) किरील दिमित्रीव्ह यांनी दिली. भारतात दाखल होणारी स्पुटनिक व्ही ही पहिली परदेशी लस असणार आहे.

भारतात करोनाचा दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून गेल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे करोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी लसीकरणावर जोर दिला जात आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिमित्रीव्ह यांनी सांगितले की, लशीची पहिली खेप १ मे रोजी भारतात दाखल होईल. यामुळे भारताला करोनाच्या संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आरडीआयएफने भारतातील पाच प्रमुख फार्मा कंपन्यांसोबत करार केला असून दरवर्षी ८५ कोटींहून अधिक डोस उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तर, येत्या काही महिन्यात पाच कोटी डोसचे उत्पादन होईल असे आरडीआयएफने म्हटले आहे. ‘स्पुटनिक व्ही’ ही भारतातील तिसरी करोना लस ठरणार आहे. रशियााने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यातच या लशीला मंजुरी दिली होती. करोनावर मंजुरी मिळालेली ही पहिली लस असल्याचे रशियाने म्हटले होते. रशियाच्या या दाव्यावर पाश्चिमात्य देशांनी आक्षेप घेत लशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लोकशाही हेल्पलाईन; ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्सचा तुटवडा असल्यास संपर्क साधा

धक्कादायक | कोरोनामुक्‍त मनोरूग्‍णाला ठेवले स्‍वच्‍छतागृहात