in

दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन

शेतकऱ्याच्या दुधाचे दर पाडल्याने रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महा विकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून , स्वतः ही दुधाने आंघोळ केली. महा विकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत आज रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर ते विजापूर रस्त्यावर आंदोलन केले. जवळपास अर्धा तास या वाहतूक खोळंबली होती.

महा विकास आघाडी सरकारने गाईच्या दुधाला प्रती लिटर ३० रुपये आणि म्हशीच्या दुधाला प्रती लिटर ६० रुपये दर देण्याची मागणी केली. या वेळी महा विकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घातला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ही दुधाने आंघोळ करून सरकारचा निषेध केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Price Today | पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहिर, जाणून घ्या आजचे दर

‘शिवसेना हा विश्वासू पक्ष’; वर्धापन दिन कार्यक्रमात शरद पवारांकडून स्तुतीसुमनं