in

‘महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी भाजपाचा स्क्रिप्टेड कार्यक्रम’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी दरमहा १०० कोटी वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकरणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र आणि भाजपावर अनेक आरोप केले आहेत.
येनकेनप्रकारेनं सत्ता मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करून भाजपाकडून राजकीय वापर केला जात आहे, असा आरोप सावंत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर केला आहे. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली. भाजपानं तपास यंत्रणांचा राजकीय वापर केला, असंही सावंत म्हणाले.

सर्व भाजपाचं षड्यंत्र आहे. राज्यात काहीच नीट नसल्याचं चित्र भाजपानं रंगवलं. पोलिसांनी अशाप्रकारे पत्र लिहून तक्रार करणं पहिल्यांदा झालं नाही. यापूर्वी गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप करणारं पत्र डीजी वंजारा यांनी लिहिलं होतं. तत्कालीन गृहमंत्री शहांवर आरोप केले होते. तेव्हा शाहंनी राजीनामा दिला होता का, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. वंजारा यांना पुन्हा सेवेत घेतलं. शाहंवर आरोप केले होते त्यांचं काय झालं, असंही सचिन सावंत म्हणाले. इतकंच नाही तर संजीव भट्ट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवरही आरोप केले होते. तेव्हा नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला होता का, असा परखड सवाल सावंत यांनी केला आहे.

माध्यमांनी तर्क काढून न्यायदान करू नये. तथ्य तपासणं गरजेचं असतं. फेब्रुवारीत वाझे देशमुखांना भेटले हे खोटं आहे. कारण तेव्हा देशमुख रुग्णालयात होते. सर्व काही स्क्रिप्टेड होतंय. कुंभांड रचलं गेलं. सरकारनं दबावात येऊ नये. गोदी मीडियाचा खोटा बनाव सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं षड्यंत्राचा विरोध केला पाहिजे, असंही सचिन सावंत म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mansukh Hiren | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात २ व्यक्तींना अटक

Gold Price Hike | पाहा आजचे सोन्याचे भाव